Availability: In Stock

Collector Sahiba | मराठी | कलेक्टर साहिबा | UPSC वालं प्रेम | कैलाश मांजू बिश्नोई | Kailash Manju Bishnoi

249.00

प्रचंड खपाच्या ‘कलेक्टर साहिबा’ या हिंदी कादंबरीचा, मराठी अनुवाद कलेक्टर साहिबा ही कादंबरी काल्पनिक असली तरी, देशपातळीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याचं वास्तव चित्रण करते. आयएएस होण्याचा प्रवास दीर्घकाळ चालू राहणारा असतो. कसोटी पाहणारा हा प्रवास केवळ उत्कृष्ट शिक्षण किंवा सरकारी नोकरी मिळवणं यापुरताच मर्यादित राहत नाही. तर आयएएसची परीक्षा देणाऱ्या मुलामुलींनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि समाज व मित्रपरिवाराचे टोमणे ऐकून घेऊनसुद्धा आपल्या ध्येयाप्रति एकनिष्ठ राहणाऱ्या प्रत्येक नवयुवकाला ही कथा आपलीशी वाटेल. लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांची ॲमेझॉन बेस्टसेलर ठरलेली मूळ हिंदीतली ही कादंबरी ध्येय, कर्तव्य आणि भावना यात ताळमेळ साधणाऱ्या एंजल आणि गिरीशची प्रेमकथा आहे. प्रशासकीय भ्रष्टाचार, लालफीतीचा कारभार अशा सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही ही कादंबरी भाष्य करते. अष्टपैलू प्रतिभा असणारे लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांना लहानपणापासूनच शिक्षण आणि खेळाची अत्यंत आवड होती. सरळ, सहज आणि बोलीभाषेतल्या लेखनशैलीमुळे देशातल्या अग्रगण्य वृत्तपत्र ‘दैनिक जागरण’मध्ये त्यांचे ‘ऊर्जा’ आणि ‘आजकल’ हे स्तंभ छापून येऊ लागले. या स्तंभांमधील त्यांचे आजच्या काळाला साजेसे आणि प्रेरणादायी लेखन वाचकांमध्ये लोकप्रिय झाले. आजपर्यंत दैनिक जागरण, दैनिक भास्कर, स्वदेश दैनिक नवज्योति, जनसत्ता, बिजनेस स्टैंडर्ड, नवभारत टाइम्स, राष्ट्रीय सहारा यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रांतून त्यांचे ५०० पेक्षाही जास्त संपादकीय लेख प्रसिद्ध झाले आहेत.

Already sold: 0/100

Additional information

Weight 224 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.